धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या परंडा तालुक्यातील लाखी गावात गृहविभाग कार्यालयीन कर्मचारी संघटनेमार्फत 116 पूरग्रस्त कुटुंबीयांना सोलापुरी चादरींचे वाटप करण्यात आले. 

परंडा तालुक्यातील लाखीसह अनेक गावात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पूरस्थितीमुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. अशा परिस्थितीत कुटुंबांना गृहविभाग कार्यालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने मदतीचा हात म्हणून सोलापुरी चादरींचे वाटप करण्यात आले. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यालयीन अधीक्षक सुनील बाबर यांच्या सहकार्याने ही मदत पूरग्रस्त कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आली. यावेळी धाराशिव शाखेचे अध्यक्ष सागर करे, अनिल पाटील, प्रकाश दांगट, श्री. सोनार, श्री. काकडे, स्वप्निल मुंडे, बाबुराव सोनकांबळे, श्री. बादाडे, चंद्रशेखर कुलकर्णी, श्री.काळुसे, दिपक भुतेकर, श्री.जोशी, श्री.निगणमोडे, श्री. म्हात्रे, मामा बसू मोटार परिवहन विभागाचे काकडे, आशिष कनाके व इतर कार्यालयीन कर्मचारी तसेच भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कानगुडे, पोलिस उपनिरीक्षक सय्यद, हवालदार घोगरे, लाखी गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.

 
Top