धाराशिव (प्रतिनिधी)-  पोलीस अधिक्षक रितू खोखर यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय मिटींग हॉल येथे जिल्ह्यातील पोलीस ठाणे अंतर्गत कामकाजाबाबत आढावा घेतला. या बैठकीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी अमंलदार पोलीस निरीक्षक, अजित चिंतले, पोलीस ठाणे कळंब, सहा पोलीस निरीक्षक मगर, पोउपनि पठाण, चालक ग्रेडपोउपनि शिंदे, पोलीस अंमलदार इंगळे, इस्ताळकर पोलीस ठाणे कळंब, पोलीस उप निरीक्षक सोनटक्के, महिला पोलीस हावलदार अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष,  धाराशिव, सहा पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, पोउपनि टेकाळे, पोलीस हावलदार सराटे, पोलीस अंमलदार सलगर, नरवडे, माने पोलीस ठाणे तामलवाडी, सहा पोलीस निरीक्षक भालेराव, पोउपनि भोजगुडे, पोलीस अंमलदार जाधव, सय्यद, सहा पोलीस निरीक्षक  गोरक्षनाथ खरड पोलीस ठाणे अंबी, सपोफौ काळेवाड, पोलीस अंमलदार पवणे, मुलाणी पोलीस ठाणे अंबी यांचे प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच मालाविषयक व शरीराविरुध्दचे गुन्हे संदर्भात आढावा घेवून उघडकीस न आलेले गुन्हे जास्ती जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या. तसेच अवैध धंद्यावर जास्तीत जास्त कारवाया करण्या बाबत सुचना दिल्या. तसेच श्री शारदीय नवरात्र बंदोबस्त  चांगल्या प्रकारे पार पाडल्या बद्दल सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार कौतुक केले. सदर मिटींगला पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

 
Top