धाराशिव/भूम (प्रतिनिधी)-  भूम परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटात उभा करण्यासाठी शासनाच्या अनुदानापलीकडे जाऊन मित्राच्या माध्यमातून व आता शासकीय योजनांच्या जोडीला क्रॉउड फंडिंगही माध्यमातून हातभार लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भूम तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत आढावा घेण्यासाठी व पशुधन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी आले असता त्यांनी नुकसानग्रस्त फळबागा शेतकऱ्यांना सुद्धा भेटी दिल्या ज्यांच्या जमिनी खरडून वाहून गेल्या अशांना भेटी दिल्या. याबाबत त्यांनी भूम उपविभागीय अधिकारी रेवैया डोंगरे, तहसीलदार जयवंतराव पाटील, नायब तहसीलदार जाधव यांच्याशी चर्चा करून पूर्ण अनुदानाबाबत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी भूम येथील पत्रकाराची संवाद साधताना सांगितले की, आपल्या भागातील शेतकऱ्यांना अनुदाना पलीकडे जाऊन उभा करण्यासाठी खूप काही करणे गरजेचे आहे. नूतन कर्ज रुपी पैसा उपलब्ध करावा लागणार, शेतकऱ्यांना शासकीय मदतीतून उभारता येणार नसल्याने मित्राच्या माध्यमातून व एनजीओच्या माध्यमातून अधिकाधिक फंड कसा आपल्या भागाला मिळवता येईल ते प्रयत्न करून शक्य होईल तितके ज्या ज्या शेतकऱ्यांना अधिक अधिक नुकसान झाले आहे अशांना लवकर लाभ कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा याबाबत अभ्यास करत आहेत त्यांनीच याबाबतचा आढावा घेण्यासाठी सांगितले असल्याने आणि परिस्थितीचा सखोल विचार करून या भागातील शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी जे काय करता येईल ते आम्ही पक्षाचे सर्व व सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहेत. तरी याबाबत कोणी शंका बाळगू नये कोणी आत्महत्या सारखा प्रयत्न करू नये,अशी कळकळीची साथ सुद्धा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी घातली.

प्रसंगी उपविभागीय अधिकारी रेवैया डोंगरे, तहसीलदार जयवंतराव पाटील, कृषी अधिकारी अतुल ढवळे, भाजपाचे राज्य संघटक बाळासाहेब शिरसागर उपस्थित होते.

 
Top