तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरचे सुपुञ असलेले पण मुंबई येथे केंटरींगचा व्यवसाय करणारे चंद्रकांत पांडुरंग काळे हे ओम साई माऊली ट्रस्टच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षापासून अश्विनी पोर्णिमे निमित्ताने पायी वारी करणाऱ्या लाखो भाविकांना घाटशिळ खालील रस्त्यावर तीन दिवस दर्जदार अन्नदान करतात यंदाचे हे पंचवीसावे वर्ष आहे.
या अन्नदान चा शुभारंभ रविवार सांयकाळी श्रीतुळजाभवानी माता अन्नपुर्णा देवी पुजन करुन करण्यात आले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख नेते माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, काँग्रेस जिल्हाअध्यक्ष धिरज पाटील, पुजारी मंडळ माजी सदस्य कुमार इंगळे, सागर इंगळे, गौतम रोचकरी, संदीप गोले, सुनिल दिवटे, शिवसेना संघटक अर्जुनप्पा सांळुके, जिल्हाध्यक्ष अप्पा साळुंखे अदि मान्यवर उपस्थितीत होते.