भूम (प्रतिनिधी)- मध्यरात्रीपासून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 4 ऑक्टोंबर रोजी 12 वाजता विजेच्या कडकडाटासह भूम तालुक्यासह सर्वत्र मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला आहे.
या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व भागातील नद्यांना महापुराचे स्वरूप आले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.त्यामुळे नदीचे पाणी घरामध्ये शिरले आहे. तालुक्यातील दिंडोरी येथे रात्री झालेल्या पावसाने अद्यापही संपर्क तुटलेला आहे. अति पावसामुळे नुकसान होऊन थोडेफार हाताशी आलेले सोयाबीन ही रात्रीच्या पावसाने भिजून गेले आहे .त्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे.
तालुक्यातील ग्रामस्थांचे दळणवळण व्यवस्थापन झाली आहे. तालुक्यामधील ग्रामीण भागात नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हार होत आहे .भूम जामखेड ,बार्शी ला जाणारे तीन मार्ग बंद होते. या सर्व मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडले आहे. ग्रामीण भागातील गावाकडे जाणाऱ्या फुल तुटल्यामुळे अनेक गावांचा संपर्क बंद झाला आहे.
पावसाचा जोर वाढत चालल्याने तालुक्यातील सर्वच भागातील शेतीचे प्रचंड असे नुकसान झाले आहे .खरीप पिकातील सर्व पिकामध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे. फळ पिकाचे काही भागात पाणी शिरल्याने फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळणे गरजेचे आहे.