धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलचा माजी विद्यार्थी नितीन केशव जाधव यांची जिल्हा पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती बद्दल संस्थेच्या वतीने सपत्नीक, माता- पित्यासह भव्य सत्कार केला.
शाळेचा एक विद्यार्थी मुंबई, गोरेगाव येथील जिल्हा पोलीस अधिक्षकपदी नियुक्तीचा पोलीस प्रशासनातील महत्वपूर्ण पदावर आरूढ झाल्याबद्दल या उज्वल यश प्राप्तीसाठी व भावी विद्यार्थ्यांना प्रेरणा, मार्गदर्शन लाभावे. या हेतुस्तव संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपल्या सत्काराला उत्तर देताना जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन जाधव यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात अभ्यासाबरोबर विविध स्पर्धेत भाग घेऊन आपले व पालकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मौलीक सल्ला यावेळी दिला. तर अध्यक्षीय भाषणात सचिव प्रेमाताई पाटील यांनी मुलांनी मोठया स्वप्नाचा पाठलाग करून ती पूर्ण करावीत, असा सल्ला दिला.
यावेळी निर्मला केशव जाधव, पुष्पलता नितीन जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, उपप्राचार्य संतोष घार्गे, प्रमोद कदम, यशवंत इंगळे, सुनील कोरडे, मोहन शिंदे, कैलास कोरके, विनोद आंबेवाडीकर व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मानले.