वाशी (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या वतीने जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय वाशीच्या मुलीच्या संघाने घवघवीत यश संपादन केले.
धाराशिव येथे झालेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या 17 वर्षाखालील मुलीच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली.या संघाची लातूर विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सॉफ्टबॉल संघाचे नेतृत्व सुरभी तिकीटे हिने केले. या संघात आसावरी मोरे, शालिनी कुशवाह,सिद्धी कोठावळे,वैष्णवी क्षीरसागर, प्रीती कवडे,सुप्रिया नन्नवरे, गौरवी पवार ,समृद्धी गाढवे,कनक नलवडे, श्रद्धा कवडे, साधना मोरे, सिद्धी महाकले आणि पूर्वा जाधव या खेळाडूंनी महत्त्वाची कामगिरी बजावली. या खेळाडूंना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बी.आर. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सॉफ्टबॉल संघातील सर्व खेळाडूंचे शालेय समितीचे चेअरमन तानाजी शिनगारे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप कवडे , शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नेताजी नलवडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास थोरबोले,पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
