तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आपसिंगा येथे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष ,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी महादेव असलकर सर, तालुका कृषि अधिकारी आबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि8रोजी पीक कापणी प्रयोग करण्यात आला.
: अतिवृष्टीने झालेले नुकसान कितपत आहे हे पीक कापणी प्रयोग आधारे दिसून येते त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्षपणे पीक कापणी प्रयोग करिता प्रत्यक्ष रँडम पद्धतीने निवडलेल्या दोन शेतकऱ्यांच्या शेतावर उपस्थित राहून दहा बाय पाच मीटर म्हणजेच अर्धा गुंठा सोयाबीन पिकाची विमा कंपनीच्या प्रतिनिधी, महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी व ग्राम स्तरीय समिती आणि गावकरी यांच्यासमोर कापणी करून आलेल्या उत्पन्नाची नोंद घेतली व पीक कापणी प्रयोग अत्यंत काळजीपूर्वक करण्याचे विमा कंपनीचे अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले
यावेळी सरपंच राहुल साठे ग्रामपंचायत सदस्य राहुल गोरे चंद्रकांत डांगे पप्पू पाटील माजी सरपंच दीपक सोनवणे शेतकरी विकास रोंगे मारुती कोपे पोलीस पाटील ग्राम महसूल अधिकारी श्री शिंदे सहायक कृषी अधिकारी श्रीमती रंगदळ उपस्थितीत होते.