परंडा (प्रतिनिधी)- देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्यावर हाल्ला करणारा वकील राकेश किशोर तिवारी याला तात्काळ अटक करुन त्याच्यावर देशद्रोही खटला दाखल करुन कठोर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आरपीआय (अठवले गट) च्या वतीने परंड येथे आंदोलन करून तहसिलदार यांना निवदेन देण्यात आले.
यावेळी आरपीआय चे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या नेत्रत्वात शहरातूनमोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो महीला ,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी राकेश किशोर वर कडक कारवाई करण्या बाबत घोषणा देण्यात आल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकील राकेश किशोर तिवारी याने हल्याचा प्रयत्न केला.ही घटना अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. हा प्रकार केवळ एका व्यक्तीवरचा नाही, तर भारतीय न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला आहे. या घृणास्पद कृत्याचा आरपीआय (आठवले गट) यांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला हजारो वर्षांच्या मनुवादी, वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेतून मुक्त केले.पण आजही काही विषमतावादी प्रवृत्ती समाजात जिवंत आहेत.आज जेव्हा एक दलित सरन्यायाधीश देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर विराजमान आहेत.तेव्हा त्या मनुवादी विचारांना ते सहन होत नाही त्यांच्या डोळ्यांतला हा संताप दलितांच्या प्रती असहिष्णुतेचा पुरावा आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीविरुद्ध अशा घटनेमुळे न्यायपालिकेच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सरकारने या लोकशाहीविरोधी, जातीयवादी,मनुवादी विचारांच्या राकेश किशोर याच्यावर तात्काळ आणि कठोरात कठोर कारवाई करावी सदरील आरोपीवर कार्यवाही न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशार आरपीआय चे प्रदेश सचिव संजय कुमार बनसोडे यांनी दिला आहे.
यावेळी दादा सरोदे तालुकाध्यक्ष, फकीर सुरवसे, माजी तालुकाध्यक्ष, आकाश बनसोडे सोशल मीडिया आयटी सेल जिल्हाध्यक्ष, संजीवन भोसले, जयराम साळवे, दीपक ठोसर,बाबासाहेब गायकवाड, लालासाहेब भालेराव, बापू हावळे, नितीन गायकवाड, फुलचंद ओहळ, लक्ष्मण सरवदे, धनाजी यशवद, संतोष चतुर, प्रमोद ओहळ, रामहरी ओहळ, भास्कर ओहळ,कैलास शिंदे, लखन सरवदे, प्रवीण सरवदे, भारत धेंडे, रामा वाकचौरे, रामचंद्र दाभाडे, लखन मोहिते,आदीसह महिला मोठया संख्येने उपस्थित होते.