भूम (प्रतिनिधी)तालुक्यातील देवळाली येथील गावा लगत असलेल्या नदीच्या पात्रात गणेश दगडू तांबे हा युवक वाहून गेला होता. नंतर चार दिवसांनी परंडा तालुकामध्ये त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या कुटुंबाला शासनाच्यावतीने चार लाख रुपयांची मदत त्याचे वडील दगडू तांबे व आई यांच्याकडे देण्यात आली.
तालुक्यातील देवळाली येथील युवक दि. 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी देवळाली येथून वस्तीकडे जात असताना पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊन मृत पावला. त्यांच्या कुटुंबांना प्रशासनाकडून लगेच आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदार जयवंत पाटील यांच्याकडे ग्रामविकास अधिकारी सचिन फड, प्रवीण शेटे, धनंजय शेटे यांनी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर लगेच भूम येथील तहसील कार्यालयात वडील दगडू तांबे व आई यांच्याकडे धनादेश देण्यात आला. यावेळी सरपंच श्रीपती सोनवणे, सचिन फड उपस्थित होते.