नळदुर्ग (प्रतिनिधी)- पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने जखनी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर यांच्या सचिव कु. सुजाता चव्हाण व व्यवस्थापक नागेश चव्हाण यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जखनी तांडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही पेन्सिल, शालेय बॅग, स्वप्नात, पेन, खोडरबर, साबण असणपट्ट्या आदी साहित्याची भेट देण्यात आली, त्याच बरोबर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने कु. सुजाता चव्हाण यांचा नवदुर्गा म्हणून गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामस्थानी त्यांचे आभार मानले.