कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यात आनेक गातात रविवारच्या मध्यरात्रीपासून पावसाने दुसऱ्यांदा थैमान घातल्यामुळे नद्या आणि  ओढे प्रचंड वेगाने वाहत आहेत.  त्यातच निपाणी-पाडोळी च्या ओढ्याच्या पुरात  पाडोळी येथील एका शेतकऱ्याचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना दि. 5 रोजी सकाळी सहा वाजता घडली आहे.

रविवारी सकाळी सहा वाजता, पाडोळी येथील शेतकरी विजयकुमार सत्यनारायण जोशी (वय 43) हे त्यांच्या नेहमीच्या कामासाठी, म्हणजे दूध आणण्यासाठी आणि जनावरांना चारा देण्यासाठी शेतात गेले होते. शेतातून घरी परत येत असताना, निपाणी  पाडोळी ओढ्यावर पाण्याची पातळी खूप वाढली होती. बंधाऱ्यावरून पाणी जोरात वाहत असल्यामुळे पाण्याची खोली आणि प्रवाहाचा वेग याचा अंदाज त्यांना आला नाही. दुर्दैवाने, हा अंदाज चुकल्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने त्यांना ओढून नेले. वाहत्या पाण्यात त्यांचा मृत्यू झाला आणि पाडोळी गावावर शोककळा पसरली.


मुरुड रुग्णालयात शवविच्छेदन

पावसाच्या या भयानक तांडवाचा हा बळी ठरलेल्या विजयकुमार जोशी यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

 
Top