तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील   उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्याने  तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाने जिल्हा शैल्य चिकित्सक यांना निवेदन देवुन केली आहे.

मागील सहा महिन्यापासून उपजिल्हा रुग्णालयात  सोनोग्राफी मशीन स्त्री रुग्णांच्या तपासणीसाठी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून गरीब रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यासाठी आर्थिक मनस्ताप होत आहे. या अगोदर सोनोग्राफी मशीन उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध होती  ती का बंद पडली याचे कारण काय येथे याची पण चौकशी होणे गरजेचे आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी व तपासणीसाठी ज्या  ज्या मशीन  उपलब्ध आहेत त्या विभागाचे डॉक्टर उपलब्ध  करुन देण्याची मागणी  केली आहे. याची गांभीर्य पुर्वक दखल नाही घेतल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल  असा इशारा बबनगावडे अशोक सांळुके यांनी दिला आहे.

 
Top