कळंब (प्रतिनिधी)- रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न व रोगमुक्त कुटुंब निर्माण करा, काळी आई वाचवा, हे अभियान घेऊन जालंदर पंजाब येथील ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट या कंपनीचे नॅशनल मार्केटिंग हेड सुखविंदर सिंग व हनी सिंग यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले. यानंतर कळंब येथे शेतकरी मेळावा घेऊन शेतकऱ्यांना जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कमी खर्चामध्ये उत्पादन चांगले काढण्यासाठी सेंद्रिय शेती केलेले फायदेशीर ठरेल असे सखोल मार्गदर्शन केले .
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की रासायनिक खताचा अतिवापरामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. कॅन्सर सारख्या महाभयानक आजारापासून येणाऱ्या पिढ्या वाचवण्या साठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही,असे मत त्यांनी व्यक्त केले .यावेळी गुरुकृपा हर्बल एजन्सी जी प्लॅनेट कळंब येथे या मेळावाचे आयोजन दि. 13 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी पत्रकार विलास मुळीक,प्रा.जगदीश गवळी, प्रगतशील शेतकरी अनिल फाटक,नितीन कापसे, किशोर शिंदे,नानासाहेब पाडे , सिद्धेश्वर तांबारे, सरपंच पठाण यांच्या उपस्थितीत या मान्यवरांचा व प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ईश्वर भोसले यांनी केले.