नळदुर्ग (प्रतिनिधी)- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. उध्दव भाले यानी मराठवाडयातील काळ्या मातीमधून ट्रायकोडरमा नावाच्या जैविक व मैत्र बुरशीचे वाण वेगळे करून प्रयोगशाळेत विकशीत केलेले आहे. ट्रायकोडरमा शेतीसाठी अतिशय उपयुक्त सूक्ष्मजैविक आहे. हे जैव-खतआणि जैव-कीटकनाशक दोन्ही म्हणून काम करते. ट्रायकोडरमा हे मातीतील रोगांवर नियंत्रण करते.ट्रायकोडरमा जमिनीत असलेल्या हानिकारक बुरशीवर (जसे Fusarium, Rhizoctonia,Pythium, Sclerotium,Macrophomina ) आदी परजीवीसारखे वाढते आणि त्यांना नष्ट करते.
त्यामुळे मुळकुज, खोडकुज कोंबकुज आदी सारख्या रोगांवर नियंत्रण ठेवते.ट्रायकोडरमाच्या वापराने मुळांची वाढ वाढवते आणि मुळांच्या आसपास वाढून ती मातीतील पोषक द्रव्ये अधिक कार्यक्षमतेने शोषतात.त्यामुळे पिकाची वाढ, हिरवळ आणि उत्पादन क्षमता वाढते.जैव-खत म्हणूनही ट्रायकोडरमा मातीतील फॉस्फरस आणि इतर सूक्ष्म घटक पिकाला उपलब्ध करून देते.जमिनीतील जैविक क्रियाशीलता वाढवते. तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करते:जैविक नियंत्रणामुळे रासायनिक औषधांचा वापर कमी होतो, पर्यावरण पूरक शेतीस मदत होते.
बीजोपचारासाठी म्हणजे बियाणे पेरण्यापूर्वी ट्रायकोडरमा च्या मित्रणाने/ जिवंत पावडरने बियाणे वाळवून लावल्यास बियाण्याची उगवण क्षमता चांगली होते आणि रोगांपासून संरक्षण मिळते. खरीप रब्बी व उन्हाळी जसे की भात, गहू, कडधान्ये, अन्नधाने, सोयाबीन, कापूस, अद्रक, हळद ऊस, भाजीपाला, फळबाग इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त.
त्या अनुशंगाने आज बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक मा प्रदीपकुमार शरणप्पा मंटगे यांच्या जळकोट, जळकोटवाडी शेतामध्ये प्रत्यक्षपणे हरभरा व ज्वारीच्या बियाणावर ट्रायकोडरमा हरजीयाना या जैविक बुरशीच्या वाणाचा वापर कसा करावा तशा अनुसंघाचे बियाणा ट्रीटमेंट देण्याचे प्रात्यक्षिके करून दाखवले.आणि ते बियाणे तयार झालेल्या शेतीमध्ये लागवड करण्यात आली. हा प्रयोग वनस्पतीशास्त्र विभागामार्फत “एक्सटेंशन ऍक्टिव्हिटी इन फार्मर्स फिल्ड“ च्या अंतर्गत करण्यात आली त्यामध्ये जवळजवळ 15 शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकांचा लाभ घेतला भविष्यामध्ये अशा प्रकारचे ऑरगॅनिक शेती तंत्रज्ञान विकसीत करून आधुनिक शेती करण्याचा मानस निर्माण केला.अशाप्रकारे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोलाचे अशा प्रकारचे संशोधन करून ते संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे.हा एक्सटेंशन या कार्यक्रमांमध्ये बसवेश्वर फार्मसी महाविद्यालय लातूर आणि बालाघाट शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांच्यात सामंजस करारानुसार शेतकऱ्यांच्या अनुषंगाने तेथील एम फार्मसी चे दोन विद्यार्थी त्यामध्ये श्री ओमकार रणखांब आणि घनश्याम निरगुडे या दोन विद्यार्थ्यांनी या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवून नळदुर्ग महाविद्यालयाने फार्मसी महाविद्यालयातील सामंजस्य करारातील कार्यप्रणाली यशस्वीपणे पार पाडली.प्रात्यक्षिकामध्ये संशोधक विद्यार्थी किरण हंताळकर निकिता कांबळे जळकोट जळकोटवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.अशा ह्या कार्यप्रणालीवर बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक मा प्रदीपकुमार मंटगे फार समाधानी आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेल्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासाठी आभारीही मानले आहेत.