नळदुर्ग (प्रतिनिधी)-  तांबड्या मातीत रांगडे खेळाडू तयार करणारा खेळ म्हणून कुस्ती या खेळाकडे पाहिले जाते. कालांतराने महाविद्यालय स्तरावर बदल होऊन मातीतील कुस्तीची जागा मॅटने घेतल्यामुळे महाविद्यालयीन स्तरावर देखील चांगले कुस्ती पटू तयार होत आहेत. असे मत बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले. 

नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 ते 13 ऑक्टोबर 2025 दरम्यान नळदुर्ग येथील महाविद्यालयात मुलांमुलींच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागाच्या पदवीधर  मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ विभागाचे क्रिडा संचालक डॉ. सचिन देशमुख, महाराष्ट्र राज्य ऑलंपिक संघटना उपाध्यक्ष डॉ चंद्रजित जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेती कु गौरी शिंदे, डॉ. सचिन सलामपुरे, प्राचार्य डॉ रामदास ढोकळे, प्राचार्य डॉ संजय कोरेकर, प्राचार्य डॉ मोहन बाबरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व प्रतिमा पुंजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील, डॉ अशोक कदम, डॉ. शिवाजी घोडके, डॉ. हंसराज जाधव यांनी केले. 

या कार्यक्रमास बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, डॉ.अभय शहापूरकर, बाबुराव चव्हाण,  अँड.प्रदिप मंटगे, शहबाज काझी, लिंबराज कोरेकर, पटू महादेवप्पा आलुरे, मैनोद्दीन शेख, विनायक अहंकारी, नवाज काजी, सुधीर हजारे, इमाम शेख, अझहर जहागिरदार, सुभद्राताई मुळे, कल्पना गायकवाड, यांच्यासह गावातील व परिसरातील नागरीक व महाविद्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top