तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी दिपावली व नाताळ सुट्टीच्या काळात वाढणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करून, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने विशेष दर्शन व्यवस्था जाहीर केली आहे. 14 ऑक्टोबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमा या दिवशी मंदिर पहाटे 1.00 वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनार्थ खुले राहतील. असे प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी कळविले आहे. गर्दी दिनी चरणतीर्थ पूजा रात्री 1.00 वाजता होणार असून, त्यानंतर तात्काळ धर्मदर्शनास प्रारंभ होईल. सकाळच्या अभिषेक व पूजा घाट सकाळी 6.00 वाजता पार पडेल.
अभिषेकाची वेळ
सकाळी: 6.00 ते 10.00 सायंकाळी: 7.00 ते 9.00 अशी असणार आहे. अभिषेकाच्या कालावधीत देणगीदर्शन बंद राहील, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भाविकांची सोय, सुरक्षेची काळजी आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.