मुरुम (प्रतिनिधी)- भारत शिक्षण संस्था संचलित मुरूम येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा सघ प्रथम क्रमांक पटकावला , एकुरगा येथे संपन्न झालेल्या 19 वर्षाखालील तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांचा संघ दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरावर निवड झाली याबद्दल संघाचा कौतुक व अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल भैया मोरे, उपाध्यक्ष अश्लेष भैया मोरे सचिव पद्माकरराव हराळकर शालेय समितीचे अध्यक्ष त्र्यंबक इंगोले प्राचार्य गोविंद इंगोले व क्रीडा शिक्षक बालाजी इंगोले, आदींनी विजेते टीम सुमित मुळजे, शुभम जाधव, आशिष घोडके, प्रतीक करंगळे ,समर्थ घोडके ,रोहन पवार ,किरण कनमुसे ,चंद्रकांत सुतार ,कार्तिक हारके, अमर राठोड ,उदय राठोड, पियुष वाघदरे ,या सर्व खेळाडूचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.