धाराशिव (प्रतिनिधी)- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते श्वेता सागर दुरुगकर यांनी कार्यकर्ते सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.
शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचऊन शिवसेना संघटना बळकट कराल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी शामलताई वडणे, सोमनाथ गुरव, रोहित निंबाळकर, तुषार निंबाळकर, दिनेश बंडगर, मनीषाताई वाघमारे, पंकज पाटील अभिजित देशमुख, मंगेश निंबाळकर, सागर दुरुगकार, प्रतीक निंबाळकर, अभिजीत निंबाळकर, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे, सात्विक दंड नाईक, बंडू आदरकर, गणेश असलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
