धाराशिव (प्रतिनिधी)-  चैन धर्मियांचे सिध्दक्षेत्र असलेल्या कुंथलगिरी येथील दिगंबर जैन मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा तत्काळ तपास लावावा व कुंथलगिरी येथे पोलिसांची गस्त वाढवावी या मागणीसाठी सकल जैन समाजाच्यावतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी श्री कुंथलगिरी सिद्धक्षेत्र दिगंबर जैन मंदीर येथे 12 ते  15 चोरटयानी चोरी करुन तेथील दानपेटी फोडून रोख रक्कम अंदाजे रु.6 लाख, मौल्यवान वस्तू एकुण 15 ते 20 लाख रुपये. तसेच पवित्र अशा 8 जिनप्रतिमा/ मुर्ती चोरीला गेल्या आहेत. यामध्ये पंचधातू प्रतिमा,स्फटिक मणी प्रतिमा आहेत. याचा लवकरात लवकर शोध लावून त्या जिनप्रतिमा मिळवून द्याव्यात,चोरट्यांना कडक शासन व्हावे व धाराशिव जिल्ह्यातील सर्व जैन मंदिराला सुरक्षा यंत्रणा पुरवावी.धाराशिव जिल्ह्यात जैन धर्मियांचे एक सिद्धक्षेत्र चार अतिशय क्षेत्र असून पंधरा दिगंबर जैन मंदीर आहेत.मागिल काही महिन्यात चोरटे जैन मंदिराला लक्ष करीत आहेत.ही बाब लक्षात घेऊन अशा ठिकाणी पोलिस गस्त वाढवावी, अशी विनंती करण्यात आली.

मुंबई यांची तीन एकर जमीन व जैन मंदीर बेकायदेशीर व घटना बाह्य पद्धतीने विक्री प्रकरणात लक्ष देऊन तो व्यवहार रद्द करण्यात यावा याचे एक वेगळे निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी निवेदन स्विकारले. हे निवेदन देण्यासाठी सकल जैन समाजातील उल्हास चाकवते, संतोषभाई शहा, राजाभाऊ जगधने, सुरेश फडकुले, सुदेश फडकुले, संदेश गांधी, अमित गांधी, शैलेश शहा, प्रशांत येणेगूरे, अमित अजमेरा, मनोज चाकवते, प्रसन्न फडकुले, सुनिल वायकर,अतुल कांबळे, कुणाल मेहता, हेमंत पांडे, श्वेता दुरूगकर, सुमन चाकवते, अर्चना गांधी व जैन समाजातील अनेक बंधू व भगिनी हजर होत्या.


 
Top