तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील  श्री तुळजाभवानी देविच्या मंदीरात सोमवार, दि. 20 ऑक्टोबर सोमवती अमावस्या निमित्ताने शतकानुशतके चालत आलेला पारंपरिक “भेंडोळी उत्सव” संपन्न होणार आहे.

दिपावली निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम  पुढील प्रमाणे  सोमवार, दि. 20 ऑक्टोबर  नरकचतुर्दशी:देवीला  पहाटे  तीन वाजता  अभ्यंगस्नान  सोमवती .अमावस्या  प्रार्श्वभूमीवर  संध्याकाळी कालभैरव मंदिरातून भेंडोळी प्रज्वलित करुन ती मंदीरात आणली जाणार  असुन नंतर ती कमानवेस भागातील डुल्या हनुमान मंदीरात आल्यानंतर अहिल्या देवी होळकर विहीरीतील जलाने शांत केली जाणार आहे. मंगळवार दि. 21 आँक्टोबर अमावस्मा समाप्ती 05.54, राञौ छबिना. बुधवार दि. 22 ऑक्टोबर बलिप्रतिपदा दिपावली  पाडवा या दिवशी देवीला विशेष पुरातन अलंकार परिधान करून रात्री छबिना उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडेल. गुरुवार, दि. 23 ऑक्टोबर  भाऊबीज. दिवाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर दि. 22 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2025 पर्यत भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून श्री तुळजाभवानी मंदीर पहाटे 1.00 वाजता चरणतीर्थासह खुले करण्यात येणार आहे. अभिषेक विधीचा कालावधी मात्र पूर्वीप्रमाणेच राहील. दिपावली निमित्ताने मंदिराच्या राजेशहाजीमहाध्दार मध्ये आकाशकंदील लावण्यात आला असून, संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक .विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 
Top