धाराशिव (प्रतिनिधी)-  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. 12.10.2025 रोजी 05.00 वा.सु. धाराशिव शहर  पोलिस ठाणे हद्दीत गस्त करत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,वैराग रोड धाराशिव येथे एका पांढरे रंगाचे पिकअप मध्ये गोवंशीय मांस आहे अशी बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून 05.30 वा. सु. छापा टाकला असता पथकास सदर ठिकाणी पिकअप क्र एमएच 25 एजे 6495 दिसल्याने पथकाने सदर पिकअपची पाहणी केली असता पिकअप मध्ये गोवंशीय जातीचे जनावरांचे मांस मिळून आले. यावर पथकाने अंदाजे 5 लाख रूपये किंमतीच्या नमूद पिकअपसह त्यातील अंदाजे 3 लाख 52 हजार रूपये किंमतीचे सुमारे 1,760 किलो गोवंशीय मांस जप्त केले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5 (ए) (1) (c)9 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, रितू खोखर अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इज्जपवार, सहा पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हावलदार समाधान वाघमारे, दयानंद गादेकर, चालक पोलीस अमंलदार दहिहंडे, धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हावलदार आडगळे, पोलीस अंमलदार मामिलवाड यांच्या पथकाने केली आहे.


 
Top