भूम (प्रतिनिधी)- शेतकऱ्याच्या पीक कर्ज माफी व इतर मागण्यासाठी भूम येथे शेतकरी पुत्र हभप सतीश महाराज कदम यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे दि. 6 ऑक्टोबर रोजी येथील गोलाई चौकात अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
येथील उपविभागीय कार्यालयासमोर मागील चार दिवसापासून हभप सतीश महाराज कदम शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषण करत आहेत. प्रशासनाने चार दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे शेतकरी पुत्रांनी रस्ता रोकोचे हत्यार उपसत प्रशासनाला जागे करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला. भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मर्यादेच्या पालीकडे नुकसान झालेले आहे. सतत पडणान्या पावसामुळे तरकारी शेतमाल शेताच्या बाहेर काढता न आल्यामुळे, तो तसाच शेतामध्ये सडून गेल्यामुळे तरकारी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. फळबाग (द्राक्ष, डाळिंब, पेरु, संत्री, केळी, चिकू, सिताफळ, आंबा, ड्रॅगनफ्रूट, बोर इ. बहुवार्षिक पिके) बागायतदार शेतकरी में महिन्यापासून या सतत पडणाऱ्या पावसामुळे हैराण झालेले आहेत. फळबागायतदार शेतकयांच्या झालेल्या नुकसानीला तर हदच नाही. अशा एक ना अनंत नुकसानी या वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत.
हभप कदम महाराजांच्या उपोषणास मनसेचे माजी राज्यमंत्री बाळ नांदगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रंजीत पाटील यांच्यासह घाटनांदुर येथील हभप शुभम महाराज यांनी भेट घेऊन पाठिंबा दर्शवला.