परंडा (प्रतिनिधी)- शासनाकडुन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मिळणारी मदत गावखेडयातील दलित समाजाला ही मिळाली पाहिजे असे निवेदन परंडा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठवले गट ) प्रदेश सचिव संजयकुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार ( दि.६ ) रोजी देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष दादासाहेब सरवदे, फकीर दादा सुरवसे ,सोशल मीडिया आयटी सेल जिल्हा अध्यक्ष आकाश बनसोडे, संजीवन भोसले, बापू हावळे, दीपक ठोसर, भारत धेंडे, प्रवीण सरवदे, लखन सरवदे,बबन भोसले, गणेश शिंदे, जयराम साळवे, उत्तम ओहोळ ,बाबा गायकवाड, विलास भोसले, हरिभाऊ आढाळे हजारो पदाधिकारी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे . विशेषत: धाराशिव जिल्हयातील परंडा तालुक्यातील गावांचे अतिवृष्टी व नद्यांच्या महापूरामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये अनेक शेतकऱ्यांची घर ,शेती ,पिक ,जनावरं वाहून गेली. तसेच नदीच्या काटातील जमीनीची माती मोठ्या प्रमाणात वाहुन गेली आहे.तसेच शासनाकडुन मिळणारी मदत येत असून ती तालुक्यातील दलित समाजातील नागरिकांना ती मिळत नाही.दलित समाज मोठ्या प्रमाणात वंचित राहत आहे.तरी तालुक्यातील पुरग्रस्त अनुसूचित जाती व जमाती (दलित) लोकांची स्वतंत्र यादी तयार करुन शासनाकडून मिळणारी मदत त्यांच्या पर्यंत पोहबवण्यासाठी आपल्या स्तरावरुन संबंधीत प्रशासकीय यंत्रणेला आदेशीत करावे. तसेच परंडा शहरातील किल्ला खंदकमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठले असल्याने त्या पाण्याचे भिमनगर गल्ली मधील घरामध्ये पाण्याचे उपळे निघत आहे. त्यामुळे भिमनगर गल्ली मधील घरे पडुन जिवित हानी होऊ शकते.त्यामुळे त्यांची सोई करण्यात यावी.तरी सदरील निवेदनाची दखल घेऊन तात्काळ उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.