धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना बसच्या संदर्भात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

जे विद्यार्थी धाराशिव शहरातून किंवा इतर गावातून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकण्यासाठी येतात त्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 09:00 वाजता ज्या बसेस त्या महाविद्यालयासमोरुन जातात त्या बसेस तिथे थांब्याव्यात. तसेच सायंकाळी 05:00 च्या नंतर तुळजापूर वरून येणाऱ्या बस ही थांबवण्यात याव्यात.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाविद्यालयासमोर बस थांबा द्यावा व त्या ठिकाणी बस थांबाव्या. बस थांबा असुन पण ज्या ठिकाणी बस चालक बस थांबवत नाहीत त्या बस चालकावर कार्यवाही करण्यात यावी. अशा मागण्यासह निवेदन देण्यात आले. या मागण्या पाच दिवसात सोडविण्यात याव्यात. अन्यथा विद्यार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. यावेळी शहर मंत्री कु. साक्षी पाटील, सहमंत्री गजानन माळी, परमेश्वर सुर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top