तुळजापूर (प्रतिनिधी)- येत्या तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीबरोबर युती झाली तर आघाडीला प्राधान्य, मात्र जर ती शक्य झाली नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) स्वबळावर निवडणूक लढविण्यास पूर्णपणे तयार आहे. असे ठाम प्रतिपादन शिवसेनेचे नेते रुषीकेश मगर यांनी केले.

शिवसेना तुळजापूर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नगरपरिषद निवडणूक आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना रुषीकेश मगर म्हणाले की,“आपल्याला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या  सारखे  आश्वासक चेहरे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड मताधिक्याचा फायदा आपणाला या निवडणुकीत घेता येईल. येत्या काळात मोठे पक्ष प्रवेश होणार असून शिवसेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.”असे सांगुन“आपण मला आनंदाने स्वीकारले, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांनी मी शिवसैनिकांच्या पाठीशी उभा आहे. आगामी काळात शिवसेनेचा भगवा तुळजापूर नगर परिषदेवर  महाविकास आघाडी झेंडा फडकविणे हेच आपले उद्दिष्ट आहे.

बैठकीला शहर प्रमुख राहुल खपले, शहर संघटक अर्जुन साळुंके, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, शाम पवार, भरत जाधव, विकास भोसले, अनमोल साळुंके, अनंत क्षीरसागर, नवनाथ जगताप, सागर इंगळे, बळीराम जगताप, कालिदास नाईकवाडी, रवी लबडे, विनोद बनसोडे, ओम मगर, अरुण भोजने, संतोष पाचंगे, आंगद साळुंके, जयाजी जगदाळे, कुंदन काळे, शहाजी गायकवाड, राहुल कणे, प्रसाद उंडरे, केदार शिंदे, विकी वाघमारे, महावीर कंदले, सचिन कोकीळे, स्वरूप कांबळे, अंबेश्वर देशमुख, सुरेश कदम आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीनंतर तुळजापूर शहरातील शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे जाणवले. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या तयारीमुळे स्थानिक राजकारणात नवा राजकीय रंग चढला आहे.

 
Top