धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला पहिल्यांदाच भरघोस 140 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीमधून शहरातील 59 रस्ते व इतर कामांना खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींनी मंत्री महोदयांचे आभार मानायला पाहिजे होते.परंतु न.प. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकासह युतीतील पक्ष श्रेयवादावरून वादविवाद करत आहेत. अशी टिका शिवसेनेचे शहरप्रमुख आकाश कोकाटे यांनी केली आहे. 

परंतु निधी कोणी मंजूर केला आणि कोणी मंजूर करवून आणला याचे भान स्वार्थाचे राजकारण आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे महापाप करणाऱ्यांना राहिलेले नाही.  धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था करून ठेवलेले उबाठाचे खासदार, आमदार आणि तत्कालीन नगराध्यक्ष 140 कोटीच्या निधीवर देखील डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपल्या धाराशिवचे विद्यमान कर्तव्यदक्ष पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सदरील निविदा ही चुकीच्या पद्धतीने केली आहे नियमांचा भंग करून केली आहे. काही राजकीय मंडळींच्या लाडक्या गुत्तदाराला सदर 140 कोटी चे काम मिळावे यासाठी अत्यंत टोकाचे प्रयत्न केले आहेत. तरी देखील ‌‘गिरे भी तो टांग ऊपर'  या उक्तीप्रमाणे आम्हीच हा निधी मिळवून आणला आणि शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आमच्यामुळेच होणार असा डांगोरा पिटण्याचे काम काही लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. त्यांना येत्या निवडणुकीत चिखल आणि धुरळ्यात जगणारे धाराशिवकर उताणे पाडल्याशिवाय राहणार नाहीत.

 
Top