भूम (प्रतिनिधी)-  रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची सोडवणूक होत नसल्यामुळे दि. 13 ऑक्टोंबर 2025 पासून मध्यवर्ती कार्यालयासमोर करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनास भूम आगारामध्ये एकत्र येत संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला .

एस.टी. महामंडळातील कामगारांच्या अनेक आर्थिक मागण्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबीत असल्यामुळे एस.टी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र एस.टी कामगार मध्यवर्ती संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून प्रलंबित आर्थिक मागण्यांची सोडवणूक होण्यासाठी दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक साहेब, म.रा.मा.प. महामंडळ, वाहतूक भवन, मुंबई यांना रितसर आंदोलन नोटीस देण्यात आलेली आहे. सदर नोटीसच्या अनुषंगाने दि. 13 ऑक्टोंबर 2025 रोजीपासून एस.टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय, मुंबई समोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.

दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजीच्या धरणे आंदोलनाची योग्य दखल प्रशासन व शासन पातळीवर न घेतली गेल्यास व रा.प. कामगारांच्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास सदरच्या आंदोलनाची तिव्रता व व्याप्ती वाढविण्याच्या समर्थनार्थ रा.प.भूम आगारातील महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृतीसमितीशी संलग्नीत सर्व कर्मचारी बांधव सदर धरणे आंदोलनात दि. 14/10/2025 रोजीपासून सहभागी होणार असल्याचे निवेदन आगारप्रमुख यांना महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने देण्यात आले.

 
Top