धाराशिव (प्रतिनिधी)-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील सर्व प्राध्यापक, एकत्रित वेतनावरील प्राध्यापक, व शिक्षेकेत्तर कर्मचारी,  यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून काल रामवाडी येथे अत्यावश्यक सामानाची किट पूरकाळामध्ये घरामध्ये पाणी शिरल्याने दुसरीकडे निर्वासित करण्यात आलेल्या कुटुंबाना देण्यात आली. या उपक्रमातून रामवाडी  येथील पूरग्रस्त 50 कुटुंबियांना मदत करण्यात आली. हा उपक्रम सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्यातून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संचालक डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनात राबाविण्यात आला. तसेच गावामध्ये स्वच्छता करण्यात आली. गावकऱ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला. गावचे सरपंच सौ. रेखा कोळी, तलाठी व्ही. बी. मुंडे, जिल्हा प्रशासनातील श्री. राहुल इबत्ते व श्री. जि. एस. स्वामी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. जितेंद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले.

 
Top