धाराशिव (प्रतिनिधी)- बोरगाव राजे येथील विठ्ठल रुक्मिणी नवीन मंदिरचा भूमिपूजन शुभारंभ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अरविंद गोरे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव यांचे शुभ हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाला. बोरगाव राजे ग्रामस्थांच्या वतीने सहकार रत्न, मराठवाडा भूषण, नुकताच गोरे दादांना साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पुष्पहार,शाल, फेटा, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार सरपंच नाना ढवळे, सोसायटी चेअरमन वेंकट ढवळे, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव पाटील यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
तसेच बोरगाव राजे साठवण तलाव शंभर टक्के भरल्याबद्दल गोरे दादांच्या हस्ते पुष्पहार,श्रीफळ अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आला. तसेच चिखली येथील संचालक कुंद पाटील, टाकळीचे संचालक राहुल सूर्यवंशी, पाडोळीचे संचालक भारत गुंड, युवतीचे संचालक मा. राजेश पाटील, कामेगावचे मुंडे, श्री. रमेश ढवळे इंजिनियर, मा. सरपंच दादा पठाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. दत्तात्रेय शिंदे यांनी केले प्रास्ताविक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी केले. रामकृष्ण मते गुरुजी चिखली यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सत्कारमूर्ती गोरे यांनी आपले विचार मांडले त्यामध्ये त्यांनी बोरगाव राजे आणि त्यांची असणारी जवळीकता त्याचबरोबर वारकरी सांप्रदाय वारसा लाभलेले हे गाव, या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाच्या निमित्ताने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामस्थांशी संवाद साधता आला त्याच्याबद्दल ही त्यांनी विशेष कौतुक केले. मंदिराची उभारणी गुत्तेदार संदीप गुंड साहेब यांच्याकडून चांगल्या पद्धतीची होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी आभार प्रदर्शन मा. दादा पठाण यांनी करून आजच्या शुभ मुहूर्तावर हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ॲड. दिगंबर मुंडे, काका मुंडे, युवतीचे ग्रामपंचायत मेंबर प्रकाश माळी, कामेगावचे विश्वजीत मुंडे, बाहेरगावावरून उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे तसेच या कार्यक्रमासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केलेले ॲड. दत्ता शिंदे, उपसरपंच चैतन्य शिंदे, शैलेश पाटील त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचे आभार मानून चहापाणी, नाश्ता करून हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.