तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सवातीन ऐक टप्पा पुर्ण झाला असताना ही तुळजापूर ते अक्कलकोट या दोन तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या मंगरुळ मार्गे रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे यंदा कर्नाटकाराज्यातुन पायी येणाऱ्या भाविकांचे प्रचंड हाल होत आहे   सार्वजनिक बांधकाम विभागाचा  शारदीयनवराञोत्सव तयारीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे त्यामुळे जिल्हधिकारी या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्षलागले आहे.

या बरोबरच तिर्थक्षेत्र तुळजापूरकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यावरही खड्डे पडत आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवातील लाखो भाविकांची पायी वारी यंदा खड्डेमय रस्त्यांमुळे

खडतर ठरणार असल्याचे दिसत आहे. नवरात्रोत्सवातील पायी वारी ठरणार खडतर तुळजापूर ते अक्कलकोट मार्गावरील मंगरुळ पाटी ते नांदुरी दरम्यानच्या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे भाविक व प्रवाशांना अक्षरशः मृत्यूच्या दारी नेणारे धोके निर्माण झाले आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून कसरत करत प्रवास करावा लागत आहे. सदरील रस्ता काही ठिकाणी खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने या

रस्त्याची दुरुस्ती होते. परंतु, ती निकृष्ट दर्जाची होत असल्याने महिनाभरातच रस्ते पुन्हा जैसे थे होतात. यामध्ये कंत्राटदार, अधिकारी मालामाल तर प्रवासी बेहाल होत असल्याचा कारभार दिसून येत आहे. कर्नाटकाह अक्कलकोटवरून ही दरवर्षी हजारो भाविक शारदीय नवरात्रोत्सवात पायी वारी करत तुळजापूरला श्री तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनासाठी येतात. मात्र,यंदा या खड्डेमय रस्त्यामुळे त्यांची नवरात्रातील पायी वारी खडतर ठरणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शारदीयनवराञोत्सव साठी केलेल्या कामांची चौकशी भाविकांचा जीवाशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई  करण्याची मागणी होत आहे.

 
Top