धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील बीए भाग तीन ची विद्यार्थिनी आनंदी पवार सह महाविद्यालयातील 35 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत भाग घेतला होता.त्यातील सहा विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत यश संपादन केले आहे.
सदर स्पर्धा गुंजोटी या ठिकाणी पार पडल्या. सदर स्पर्धेत कु.आनंदी पवार हिने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत विद्यापीठीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. या स्पर्धेसाठी तिने गिग इकॉनॉमी काळाची गरज या विषयावर संशोधन केले होते.या संशोधनासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. मारुती अभिमान लोंढे व डॉ.दयानंद हाके यांचे मार्गदर्शन लाभले होते. या यशाबद्दल अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आनंदी पवार या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.