कळंब (प्रतिनिधी)-  जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश स्वप्निल खटी यांच्या मार्गदर्षनाखाली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यामध्ये जी पुरस्थिती निर्माण झालेली आहे त्यातील पुरग्रस्तांना उभारी देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला. कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील 50 कुटुंबाला व धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथे 50 कुटुंबाला संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ही न्यायाधीश मागे राहिले नाहीत. न्यायदानाच्या कार्याबरोबरच समाजकार्याची त्यांनी एक सांगड घालत एक नविन पायंडा पाडून दिल्याने सर्वत्र त्यांचे कौतुकी होत आहे.

या उपक्रमामध्ये ज्या झोपडपटट्यांमध्ये पाणी गेले त्या ठिकाणच्या लोकांसाठी सर्व न्यायाधिशांच्या आणि लोकअभिरक्षक कार्यालयातील विधिज्ञांच्या माध्यमातून जीवनउपयोगी आणि संसारउपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील 50 कुटूंबासाठी संसारउपयोगी साहित्यचे वितरण नुकतेच करण्यात आले. कागदपत्रे हरविले असतील तर जिल्हाधिकारी, तहसीलदार, विधी प्राधिकरण सर्वतोपरी सहकार्य करतील असे सांगण्यात आले. 

धाराशिव तालुक्यातील पाडोळी या ठिकाणी जे पुरग्रस्त होते त्यांच्यासाठी जिल्हाभरातील न्यायाधीशांच्या वतीने संसारउपयोगी साहीत्याचे वाटप जिल्हाधिकारी  किर्ती किरण पुजार,जिल्हा न्यायाधीश आर.के. खोमणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, तहसिलदार मृणाल जाधव यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आले. कळंब तालुक्यातील मंगरूळ या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती, कळंब येथील अध्यक्ष, जिल्हा न्यायाधिष आर. के. राजेभोसले, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भाग्यश्री पाटील, आणि कळंब न्यायालयातील न्यायीक अधिकारी प्रसन्न कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी  संजय पाटील, तहसिलदार  हेमंत ढोकले, न्यायाधिश चौधरी, न्यायाधीश रेड्डी, न्यायाधीश अमृता जाधव, लोकअभीरक्षक कार्यालयातील अमोल गुंड, मुख्य न्यायरक्षक, धाराशिव जी. ए. कस्पटे, एस. बी. गाडे, व्ही. एस. म्हेत्रे यांच्या पुढाकारातून या किट्सचे वाटप करण्यात आले.


 
Top