तुळजापूर (प्रतिनिधी)-  यंदा झालेल्या अतिवृष्टी व कीडरोगांमुळे तालुक्यात खरीप पिक विशेषता सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. शिवाय बाजारात शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सोयाबीन शासन हमी भाव खरेदी केंद्रसाठी तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सध्या सोयाबीन चा भाव चार हजार आसपास असुन शासन हमीभाव 5338 रुपयाने खरेदी करणार आहे.

शेतात राबराब काम करूनही उत्पादनाच्या तुलनेत भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. दुसरीकडे रासायनिक खते, बियाणे, इंधन, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याने शेती करणे तोट्याचे ठरत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांत धान पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांना कर्जफेड करणे कठीण झाले असून, पीकविमा व नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पक्ष शेतकऱ्यांच्या संघटनांनी शासनाचे लक्ष वेधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. “उत्पादन घटले, भाव नाही, आणि खर्च वाढला; त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्थान केवळ घोषणांवर नाही तर प्रत्यक्ष मदतीवर अवलंबून असणार आहे.

 
Top