तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू असताना महावितरणच्या निष्काळजी कारभाराने नागरिकांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे.
घरगुती व व्यापारी ग्राहकांना पाठवलेल्या वीजबिलांवर स्कॅनर कोड फिक्कट रंगात छापल्याने ते मोबाईलवर स्कॅन होत नाहीत. परिणामी, ग्राहकांना, सारख्या ऑनलाइन पद्धतींनी बिले वेळेत भरता आली नाहीत. काही प्रकरणांत बिले वेळेवर न भरल्याने ग्राहकांना दंडासह रक्कम भरावी लागली. तर काही बिले महावितरण कर्मचाऱ्यांनी घराबाहेर मीटरवर ठेवून गेल्याने पावसात भिजून खराब झाली. दरम्यान, ग्राहकांना प्रत्यक्ष महावितरण कार्यालयात जाऊन बिलं भरावी लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणचा हा अनागोंदी कारभार कधी सुधारणार असा प्रश्न ग्राहकांन मधुन केला जात आहे.