धाराशिव (प्रतिनिधी)-  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून धाराशिव शहरात आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील 50 हून अधिक नामांकित कंपन्यांच्या उपस्थितीत दोन हजारहून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिली. तब्बल 478 युवकांना नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले आहे तर 503 युवकांना अंतिम मुलाखतीसाठी कंपनीत बोलावण्यात आले आहे. दर तीन महिन्याला असा महोत्सव आणि मेळावा घेण्यात येणार असून त्यामाध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.

धाराशिव शहराती पुष्पक मंगल कार्यालय मंगळवारी भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मोठ्या उत्साहात हा मेळावा पार पडला. या महोत्सवाचा शुभारंभ करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. या मेळाव्यास 2200 हून अधिक इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती. तर 3,500 पेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या उमेदवारांना येत्या वर्षभर त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधीबाबत माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या महोत्सवात राज्यभरातील 50 हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला व उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 

कार्यक्रमास माजी खासदार सुधाकरराव शृंगारे, दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, विकास बारकूल, शंतनु पायाळ, खंडेराव चौरे, अमित शिंदे, सुनील काकडे, अभय इंगळे, राहुल काकडे, अस्मिताताई कांबळे, प्रीतीताई कदम, उषाताई येरकळ, विद्या माने, नीलकंठ पाटील, संदीप इंगळे, सनी पवार, नितीन शेरखाने, सागर दंडनाईक, मदन बारकूल, कुणाल निंबाळकर, पुष्पकांत माळाले, गोपाळ कदम यांच्यासह तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, प्रा.चंद्रजीत जाधव यांच्यासह जिल्हाभरातून आलेले तरुण तरुणी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top