उमरगा (प्रतिनिधी)- कोणी नोकरदार तर कोणी उद्योजक, कोणी शेतकारी तर कोणी गृहिणी , अशा विविध क्षेत्रात, विविध ठिकाणी कार्यरत असलेले वर्गमित्र तब्बल तीन दशकानंतर एकत्र येत उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण विद्यालयातील 1995 च्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा वर्ग पुन्हा भरवला. दहावीत असताना ज्या बाकावर बसले होते. त्याच बाकावर बसून आठवणीना उजाळा देत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बसप्पा माळगे होते. प्रारंभी दिवंगत सर्व शिक्षक व वर्गमित्रांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत प्रत्येकांच्या नावे मेणबत्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला दहा डबल साइड व्हाईट बोर्ड ज्ञानदान करिता भेट देण्यात आले. तसेच शाळेतील होतकरू, गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विभावरीताई शाईवाले, उपाध्यक्ष प्रभाकरराव हिरवे, संगय्या स्वामी, महाविद्यालय विकास समिती सदस्य कॉ. अरुण रेणके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवानंद बुदले, म्हाळप्पा दूधभाते, सुरेखा भोसले, मोहिब मुन्शी, सेवानिवृत्त शिक्षक सुनीता रेणके, खंडू म्हेत्रे, विलास शाईवाले, वाय. डी. जाधव, यादव जाधव, उर्मिला मार्डीकर, विष्णू जाधव, विश्वनाथ साखरे, लिपिक मोहन घाटे, मनोहर मिरजे, सिद्राम स्वामी, विठ्ठल साळुंखे, विद्यमान मुख्याध्यापक रविराज पाटील, मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड, पर्यवेक्षक अविनाश पाटील, जीवन चव्हाण, उषा सगर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी विद्यार्थी राहुल पाटील यांनी केले. साधना रंगदळ, सचिन इबत्ते यांनी शाळेतील किस्से सांगत हशा पिकविला. शिक्षकांचा तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करताना सर्वांनी त्यांच्या आयुष्यात दिलेल्या मोलाच्या संस्काराची आठवण करून दिली. त्याकाळात मिळालेले शिक्षण आणि मैत्रीचे बंधन आजही आपल्या आयुष्याच बळ आहे, असे मत विद्यार्थ्यांनी मांडले. यावेळी माजी विद्यार्थी एकमेकांचा परिचय, संगीत खुर्ची, गाण्याच्या भेंड्या आदी उपक्रम घेत उत्साहात मेळाव्याची सांगता झाली. महेश पाटील, राहुल पाटील, इब्राहिम इनामदार, सुनील देशमुख, इंद्रजीत म्हेत्रे, तनवीर काझी, विरपक्ष स्वामी, सुलक्षणा पाटील, राखी कुलकर्णी, मधुमती मायाचारी, दत्ता पाचंगे, संजय कटकधोंड, संतोष खमितकर, विकास दूधभाते, संजय जगताप आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. इब्राहिम इनामदार व सुहासिनी चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले. रुपमती मायाचारी यांनी आभार मानले.
 
