भूम (प्रतिनिधी)- सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये दोन वेळा अतिवृष्टी झाल्याने मांजरा नदीला महापूर आला. पुराचे पाणी नदीकाठच्या पांढरेवाडी येथील रहिवासी वसाहतीमध्ये शिरले. त्यामुळे त्या नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. परंतु घरातील सर्व साहित्याचे पाण्याने नुकसान झाले. याची दखल घेत माजी आमदार राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनानुसार मुक्ताई उद्योग समूह वाघोली पुणेचे संचालक बाळासाहेब खरवडे यांनी दीपावलीचे अवचित साधत पांढरेवाडी व झेंडेवाडी येथील गरजू 200 कुटुंबांना संपूर्ण किराणा साहित्याचे किट तयार करून दि. 18 ऑक्टोंबर रोजी वाटप करण्यात आले.
सकाळी 10 वाजता झेंडेवाडी येथील 100 कुटुंबांना या कीडचे वाटप केले. तर दुपारी पांढरेवाडी येथे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष मधुकर मोटे उद्योगपती बाळासाहेब खरवडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती दासराव हुबे, शिवाजी जालन, संचालक सतीश सोन्ने, रवींद्र पवार, सरपंच संजय आसलकर, व्यवस्थापक समिती अध्यक्ष शितल हुंबे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण, सयाजी हुंबे, रवी पाटील, प. स. माजी सभापती भाऊसाहेब चोरमले, भाजपाचे शरद चोरमले, रंणजीत पवार, दादासाहेब जालन, गोरख डोके, ज्ञानदेव पवार, राजेंद्र आहेर, अजित हुंबे, भाऊसाहेब खरवडे यांच्यासह महिला ग्रामस्थ उपस्थित होते.