कळंब (प्रतिनिधी)-  येथील बस आगारातील कर्मचारी व संयुक्त कृती समितीतील पदाधिकारी यांच्या समवेत 13 तारखेच्या आंदोलनाविषयी बस आगारा समोर घंटा नाद आंदोलन करून कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सहआपल्या हक्काच्या विविध मागणी करीता महाराष्ट्र कामगार संघटना, महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना व कास्ट्राइब संघटनाचे पदाधिकारी तसेच संयुक्त कृती समितीचे सर्व पदाधिकाऱ्या मार्फत घोषणा देऊन 13 तारखेच्या आंदोलनास  पाठिंबा दर्शविण्यात आला  व  आगारप्रमुख एस. डी. खताळ यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी कळंब आगारातील  उमाकांत गायकवाड,महेश थोरबोले, महादेव देटे, आर. जी. भिसे, ए.जे.शेख, रत्नाकर जोशी, सुभाष बारकुल ,मनोज मुळीक, चेतन गोसावी, रतन लोहार, सायस खराटे, बाबा धावारे, सुबोध रणदिवे, गणेश गोरे, डिसले सह सर्व संघटनाचे प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते.

 
Top