उमरगा (प्रतिनिधी)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उमरगा शाखेच्या वतीने छात्रसत्ता विद्यार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अभाविप उमरगा शहर मंत्री म्हणून अमृता मुगळे यांची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे उपस्थित होते.
निर्वाचन अधिकारी गणेश कटके यांनी शहर मंत्री यांची घोषणा केली व उर्वरित कार्यकारणी शहर मंत्री यांनी घोषित केली. तालुका संयोजक यांनी प्रास्ताविक मांडले. प्रदेश सहमंत्री यांनी अभाविप मांडणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शहर मंत्री यांनी मंत्री प्रतिवेदन केले व आगामी दिशा सांगितली.
शहर सहमंत्री ऋषी चिंचोळे, ऋतुजा शिंदे, समर्थ कुंभार,शहर कार्यालय मंत्री कु.माधुरी आगडे,सोशल मीडिया संयोजक संकेत हळीखेडकर, स्टुडन्ट फॉर डेव्हलपमेंट संयोजक प्रणित जांभळे व सह संयोजक सृष्टी कस्तुरे,स्टुडन्ट फॉर सेवा संयोजक शेखर सूर्यवंशी व सह संयोजक चैतन्य जाधव,फार्माव्हिजन संयोजक सृष्टी ख्याडे व सह संयोजक रुपाली पवार,राष्ट्रीय कलामंच संयोजक सागर देडे व सह संयोजक श्रध्दा साखरे,खेलो भारत संयोजक प्रतीक्षा राठोड ,मिशन साहसी संयोजक गौरवी कटके,कोष प्रमुख ओमकार चव्हाण यांची निवड करण्यात आली.