तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर-धाराशिव रस्त्यावर असणाऱ्या बावी आश्रम शाळेजवळ श्रीतुळजाभवानी दर्शनासाठी जाणारी गाडी थांबली असता तीन व्यक्ती ने आतील 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असे एकुण 2 लाख 5 हजार रुपयाचा मुदेमाल चोरुन नेल्याची घटना सोमवार दि 12 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.00 वाजता घडली.

या बाबतीत अधिक माहीती अशी कि, अशोक अर्जुन खरात, वय 51 वर्षे, रा. विजयपुर (विजापूर) ता. जि. विजापूर ह.मु. गुलबर्गा हे टाटा नेक्सॉन गाडी क्र केए 28 एमए 2006 मध्ये देवदर्शनासाठी तुळजापूरकडे जात असताना दि. 13.10.2025 रोजी 02.00 वाजण्याच्या सुमारास बावी आश्रम शाळेच्या  ब्रिजच्या पुढे  रोडचे बाजूला बावी पाटी येथे गाडीतुन खाली उतरुन गाडीचा दरवाजी उघड ठेवून नैसर्गिक विधीसाठी गेले असता तीन अज्ञात व्यक्तीने  गाडीतुन 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 10 हजार रूपये व मोबाईल फोन असा एकुण 2 लाख 5 हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. अशी  फिर्यादी अशोक खरात यांनी दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी दिल्यावरुन धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top