धाराशीव (प्रतिनिधी)-धाराशीव नगर परिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे दिव्यांग-शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा अंतर्गत भव्य दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान राज्य मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भूषविले.
या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर मान्यवर उपस्थित होते. त्यात आमदार कैलास पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ झांजवळ, राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटनेच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे नेते संजय दुधगावकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, प्रहार पक्ष जिल्हा संपर्कप्रमुख अमोल जगदाळे, निरीक्षक मंगेश ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, मराठा सेवक संघटनेचे बलराज रणदिवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, प्रहार पक्ष बीड जिल्हाध्यक्ष विलास काळुंके, सातलिंग स्वामी, राकेश सूर्यवंशी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.
मेळाव्यात दिव्यांग बांधवांच्या समस्या, शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे मार्ग, रोजगाराच्या संधी व स्वावलंबन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरही विचारमंथन झाले. व्यासपीठावरून बच्चू कडूंचे आवाहन कार्यक्रमादरम्यान बच्चू कडूंनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत आवाहन केले.“मयूर काकडे यांना नगरसेवक करा.”
या आवाहनाला प्रतिसाद देताना आमदार कैलास पाटील म्हणाले “मयूर काकडे हा आमचा जवळचा सहकारी आहे. त्याच्या कार्याची दखल घेऊन आम्ही त्याला नक्की नगरसेवक करू. मग ते जनतेतून असो वा स्वीकृत कोट्यातून, हे आम्ही ठरवू. आज मी या व्यासपीठावरून शब्द देत आहे.” त्यांच्या या विधानाला व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला. आयोजन समितीमध्ये मेळाव्याचे प्रमुख आयोजन मयुर ज्ञानेश्वर काकडे (राज्याध्यक्ष, प्रहार अपंग संघटना, महाराष्ट्र राज्य) यांनी केले. संपूर्ण नियोजन प्रहार पक्ष जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
आयोजन समितीमध्ये जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव महादेव चोपदार, महेश माळी, महादेव खंडाळकर, शशिकांत मुळे,इसाक शेख, बाबासाहेब भोईटे, गणेश शिंदे, हेमंत उंदरे, दत्ता पवार, इंद्रजीत मिसाळ, भगवान होगले, नवनाथ कचार, संजय नाईकवाडी, बालाजी तांबे, कालू जाधव, कैलास यादव, दिनेश पोद्दार, शिवाजी पोद्दार, पैगंबर मुलाणी, नितीन शेळके, ललित कापरे, किशोर कांबळे, महावीर कोंडेकर, अमोल पाड़े, नितीन मुळे, व्यंकट कमळे, आशीफ शेख, सचिन शिंदे, दशरथ भाकरे तसेच जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले.
उत्स्फूर्त प्रतिसाद
या मेळाव्यास 700 ते 800 दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यांच्या उपस्थितीमुळे मेळावा भव्यदिव्य ठरला आणि सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश जनतेत पोहोचला. बच्चुभाऊंच्या स्वागतासाठी स्वाधार मतिमंद निवासी शाळा मधील चिमुकल्या मतिमंद विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या मेळाव्यामुळे दिव्यांग, शेतकरी व शेतमजूर यांच्या प्रश्नांवर नव्याने प्रकाश पडला असून, सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श उभा राहिला आहे.