धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील धनगर समाज हा मुख्यत: मेंढपाल करुन आपला उदर निर्वाह करत आहे. सदर समाज हा अन्य राज्यात अनुसुचीत जमातीमध्ये असून महाराष्ट्रात हा समाज एन.टी. प्रवर्गात असून महाराष्ट्रातील धनगर समाज हाच एस.टी प्रवर्गातून आरक्षणासाठी पात्र असल्याने भारतीय संविधान कलम 342(1) नुसार सदर समाजास अनुसुचीत जमाती अंतर्गत आरक्षण देणेबाबत श्री. दिपक भाऊ बोऱ्हाडे हे जालना येथे उपोषणासाठी बसलेले असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे.

राज्यतील धनगर समाजाला न्याय मिळावा म्हणून वेळोवेळी मागणी करत असून ही न्याय मागणी करीता दिपक बोऱ्हाडे यांचे अमरण उपोषण सुरु असून सदर उपोषण स्थळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट घेवून धनगर समाजाच्या मागणीची सरकारने तात्काळ दखल घेवून समाजास न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी खासदार बंडू जाधव आमदार कैलास पाटील यांच्यासह, आण्णा तनमोर, सुजीत हंगरकर, जयप्रकाश चव्हाण, चेतन बंडगर, विशाल पाटील आदी उपस्थीत होते.

 
Top