धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील विदयार्थी कल्याण निधी विभागाच्या वतीने तब्बल 79 गरीब व गरजू, होतकरू मुलांना शालेय गणवेश वाटप संस्थेच्या सचिव प्रेमाताई सुधीर पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाले.
शिक्षणाच्या प्रवाहात गरीब मुले टिकून राहण्यासाठी प्रशालेच्या वतीने मोफत शालेय गणवेश, वहया, पाठ्यपुस्तके यांचे वितरण प्रत्येक वर्षी करण्यात येते. यासाठी या विभागातील सर्व सदस्य समाजातील दानशूर व्यक्तीकडून निधी संकलित केला जातो. यासाठी देशमाने एम.एस सह पाटील सूर्यकांत, नितीन कदम, अरविंद जाधव, आर.जे. बोबडे हे काम पाहतात.
या कार्यक्रमास संस्था सचिव प्रेमाताई पाटील, संस्था सदस्य संतोष कुलकर्णी, प्राचार्य डॉ.अजित मसलेकर, प्राचार्य गोरख देशमाने, सेवानिवृत्त शिक्षक एन. एल. गोरसे, आर. टी. आदटराव तसेस प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील कोरडे, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, बी. बी. गुंड, विनोद आंबेवाडीकर तसेच सर्व शिक्षक, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.