धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि. केशेगाव यांच्या वतीने दीपावली निमित्त सभासदांसाठी सवलतीच्या दरात प्रति किलो 30 रुपये प्रमाणे 25 किलो प्रति शेअर्स साखर वाटप शुभारंभ दिनांक 07 ऑक्टोबर रोजी 2025 रोजी सुनील प्लाझा धाराशिव येथे करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपराव पाटील पोलीस निरीक्षक, व लक्ष्मीकांत वसंतराव जाधव अध्यक्ष व्यापारी संघटना धाराशिव यांच्या शुभहस्ते कारखाना सभासद किसन हरिबा शिंदे यांना पहिले साखर पोते देऊन शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संचालक ॲड.श्री. चित्राव गोरे, ॲड. निलेश बारखडे पाटील, तसेच युवराज वीरसेन राजे निंबाळकर, येयाती पत्तेसिंह देशमुख, पुष्पकांत माळाळे, मनोज तीर्थकर, वैजनाथ शिवाप्पा गुळवे, जयंत शिंदे, बाळासाहेब मैरान,, बब्रुवान रावण पवार, व कारखान्याचे कर्मचारी बी.व्ही.वाघमारे, लोमटे, पडवळ, पाटील, मंडलिक, गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.