नळदुर्ग (प्रतिनिधी)- शासनाच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत शहरातील सुमारे 35 लाभार्थ्यांना 14 लाख 90 हजार रुपयेचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पात्र लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले. या वेळी एकूण 35 लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप झाले तर उर्वरित लाभार्थ्यांचे कागद पत्रांची पूर्तता करण्यासाठी सांगण्यात आले. दरम्यान हे कर्ज वाटप करण्यासाठीचा मेळावा भारतीय स्टेट बँक व नगर परिषद नळदुर्ग यांच्या विद्यमाने आणि श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता, या वेळी भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक श्री घोडके, नगर परिषदेचे सुरज गायकवाड, श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संकेत भूमकर त्याच बरोबर भाजपाचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक बसवराज धरणे आदीच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले. या वेळी एकूण 35 लाभार्थ्यांना 14 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.