तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तिभावाने धाराशिव येथील एका सराफ व्यापाऱ्याने दोन चांदीच्या समई अर्पण केल्या आहेत. या समईंचे एकूण वजन 11 किलो असून त्यांची अंदाजे किंमत 16.70 लाख रूपये इतकी आहे.

देवीभक्त व्यापाऱ्याने आपल्या श्रद्धा आणि भक्तिभावातून ही भेट अर्पण केली असून मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आभार व्यक्त करण्यात आले आहेत. या प्रसंगी मंदिर संस्थानचे अधिकारी, पुजारीवर्ग व भक्तगण उपस्थित होते.


 
Top