परंडा (प्रतिनिधी )- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा धाराशिव या महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयांमधील संशोधक विद्यार्थी श्रीपाद शहाजी आतकरे यांची राज्यस्तरीय अविष्कार 2025 या स्पर्धेसाठी निवड झाली. त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यांनी इंजीनियरिंग व्हरसाटाईल डीवाय- सीई को- स्बस्टियुटुटेट बेरियम हेक्सा फेराईड नैनो पारटिकल्स फॉर अडव्हान्सड मायकोव्हेह ॲबसॉरब्शन ॲण्ड ईमआय शिल्डींग ॲप्लिकेशन या संशोधन पेपरचे दिनांक तीन व चार ऑक्टोबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय अविष्कार स्पर्धेमध्ये सादरीकरण केले होते.  डॉ.महेशकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली ते संशोधन करत आहेत.महाविद्यालयातील अविष्कार समितीचे समन्वयक डॉ.अतुल हुंबे यांचाही सत्कार करण्यात आला. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने डॉ.सचिन चव्हाण कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख, किशोर सावंत व अजय क्षीरसागर  उपस्थित होते. श्रीपाद आतकरे  यांची राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाल्याने महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे प्रशासकीय अधिकारी  भाऊसाहेब दिवाने कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अभिनंदन व कौतुक केले.

 
Top