मुरुम (प्रतिनिधी)- संपूर्ण भारत भर नवरात्र उत्सव हर्ष उल्हासात साजरा होत असताना अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेक संसार,घरदार, शेती याचे नुकसान झालेले आहे. या सर्व पूरग्रस्तांसाठी यशवंत नवरात्र महिला मंडळां ने सप्तशती पाठाचे पठण आयोजन केले होते. या पठणातून देवीला प्रार्थना करण्यात आली. हे जे मराठवाड्यावर संकट आलेल आहे ते लवकर दूर व्हावे आणि शेतकरी बांधव तसेच पूरग्रस्त यांना या सर्व संकट परिस्थितीत त्यांचे मनोबल कायम ठेवून या संकटातून लवकरात लवकर सोडवावे . यासाठी सप्तशती पठनातून देवीची विनवणी करण्यात आली .
या सप्तशती पठण करण्यात प्रा. विजया बेलकेरी, सौ.सुरेखा घोडके, सौ.सोनाली घोडके,सौ.संगीता देशमाने मॅडम, सौ.सविता गाडेकर,सौं.अंजु मोटे,सौ. प्रियंका चव्हाण,सौ.सविता जाधव,सौ. कविता जाधव,सौ.सरोजा पाटील,सौ.मिना टाचले ,सौ.पद्मा टाचले, सौ.प्रियंका राजपुत,सौ, निर्मला बोगरगे,सौ.सिमा अष्टगी,सौ,सविता धर्माधिकारी,सौ.सारिका लोहार,सौ.ञिगुळे,सौ.तांबडे या मंडळीनी सहभाग घेतला.
या नवराञ मोहत्सवात दररोज आराधी मंडळी यांचे कार्यक्रम, सांस्कृतिक खेळात कलर बलून जंप, संगीत खुर्ची, दोरी उड्या,गरबा नृत्य इत्यादी खेळांचा समावेश व तसेच महिलांसाठी सप्त शती, कुंकुम अर्चन अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच दररोज भाविकासाठी देवीची साडी चोळीने ओटी भरुन मोठ्या भक्ती भावाने पुजा करुन नंतर प्रसादाचे वाटप केले जाते.
या नवराञ मोहत्सव यशस्वी पणे पार पाडण्यासाठी
अमोल पालपुरे, तेजस निलवाडे, श्रीधर निलवाडे, संजय सुरवसे,गौरीशंकर बोंगरगे,चेतन कंटे, धनपाल चौव्हाण, शुभम चौव्हाण, अनिकेत पाटील, निरज पडलवार, निशांत पडलवार, मानव चव्हाण, सोमनाथ जाधव, ओंकार सुरवसे, प्रितेश राठोड, श्रेयश चव्हाण उदय घैसास, ओंकार कुंभार, सतीश कुंभार या नवराञ मोहोत्सव पदाधिका-यांचा व यशवंत नगर मधील महिला भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.