धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषद माध्यमिक  शिक्षण विभागात कार्यरत असणारे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक श्री. काझी टी. एफ. यांची माध्यमिक उपशिक्षणाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्ल त्यांचा शिक्षण  महर्षी सुभाष (दादा) कोळगे सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात  सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.  लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून पहिल्या टप्प्यात विभागातून केवळ तिघा जणांना  उपशिक्षणाधिकारी (मा) पदावर बढ़ती देण्यात आली आहे.यामध्ये श्री. काझी यांचा समावेश करण्यात आला आहे. पदोन्नती नंतर  त्यांची बदली  जालना जिल्हा  परिषद   शिक्षण (मा.) विभागात झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा डॉ आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे संचालक, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी त्यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार . केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम, पत्रकार गोविंद पाटील, किरण पवार, तेजसिंह कोळगे, अमर भोयटे, शुभम कोळगे, योगेश राठोड रोहित कोळगे यांची उपस्थिती होती.  यावेळी व्यवस्थापक शाम गंगावणे यांच्यासह कर्मचारी, एजंट यांची उपस्थिती होती.


 
Top